प्रति, 12 October 2012
मा. अध्यक्ष / सचिव / खजिनदार,
निमा,
महाराष्ट्रातील सर्व शाखा
अन्न व प्रशासन विभाग, महाराष्ट्र राज्य, बुलढाणाचे सहाय्यक आयुक्त श्री. भुषण पाटील यांच्या दिनांक ११/१०/२०१२ रोजीच्या पत्रानुसार दिनांक १५ ऑक्टोबर २०१२ ते दिनांक १८ ऑक्टोबर २०१२ या दरम्यान महाराष्ट्र राज्य केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशनने औषध दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे कळविलेले आहे. केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशनने सहाय्यक आयुक्त श्री भुषण पाटील यांच्याविरोधात वर्क टू रूल आंदोलन सुरू केलेले असून या आंदोलनाचा एक भाग म्हणुन आयुर्वेद व युनानी पदवीधारकांच्या प्रिस्क्रिपशन्सवर अँलोपँथी औषधी न विकण्याचा निर्णय केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशनने घेतलेला आहे. केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष श्री. जगन्नाथ शिन्दे यांनी मात्र गेल्या जुलैपासुन कायद्याचा बाऊ करून नाहक औषधी विक्रेत्यांवर शासनाकडून कारवाई केली जात असल्याचा आरोप केलेला असून त्यामुळे हे आंदोलनाचे पाऊल उचलल्याचे वृत्त दिनांक १२ ऑक्टोबर २०१२ च्या दैनिक लोकमत या वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेले आहे.
प्रत्यक्षात शासन राजपत्र व मेडिकल अँक्ट १९६१ नुसार आयुर्वेद व युनानी पदवीधारकांना अँलोपँथी औषधी लिहिण्याचा व वापरण्याचा अधिकार आधीपासूनच प्राप्त आहे. परंतू शासन व केमिस्ट असोसिएशन आपल्या वैयक्तिक भांडणात आयुर्वेद व युनानी पदवीधारक व गरजु रुग्ण यांना वेठीस धरीत आहेत.
हा गैरप्रकार कदापि आपली नँशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन सहन करणार नाही आयुर्वेद , युनानी पदवीधारकांना एलोपैथी लिहण्याचा ब वापरण्याचा अधिकार असल्याविषयी आपण आपल्या सर्व सदस्यांना अवगत करावे. तसेच त्याविषयी संभ्रम निर्माण होऊ न देण्याविषयी आवाहन करावे. सदर जी. आर. आपल्या वेबसाईटवर “Download” या Page वर उपलब्ध आहे. तरीही काही अडचण वाटल्यास निमा महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ. सुनिल पाटील (९४२२०४९४०५), राज्यसचिव डॉ. शैलेश निकम (९४२३९७२१३१), खजिनदार डॉ. सुभाष कांबळे (९८२३५८९९०५) किंवा प्रचार व प्रसिद्धी समितीचे अध्यक्ष डॉ. तुषार सुर्यवंशी (९४२२२५२८३७) यांच्याशी संपर्क साधावा.
सदर निर्णय केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशनने मागे न घेतल्यास राज्यव्यापी आंदोलन पुन्हा एकदा आपल्याला उभे करावे लागेल.
सदर तीन दिवसाच्या कालावधीत आपल्या रुग्णांचे गैरसोय होऊ नये यासाठी पुरेसा औषधी साठा आपण जरूर करून ठेवावा.
आपले
Please Download Following Document and News In Newspapers